लिपिक पदाच्या 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख

BMC Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज उद्यापासून चालू होतील.सविस्तर जाहिरात उद्या प्रकाशित होईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रु. 25,500-81100 (पे मॅट्रिक्स-एम १५) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) या संवर्गातील 1 हजार 846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506) याप्रमाणे रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. तसेच या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले असून त्याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये समाविष्ट आहे.

 

Leave a Comment